मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता सगळीकडूंन उद्धव ठाकरेंची कोंंडी करण्यात येत आहे. शिवसेनेचे संसदीय कार्यालय, तसेच विधीमंडळ कार्यालयावर एकनाथ शिंदे यांनी कब्जा केला आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यातच आता सभागृहात देखील ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार आमनेसामने येत असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फिनिक्स भरारी घेईल, असा आशावाद ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी
“कोण म्हणतं शिवसेना पक्ष चोरला , कोण म्हणतं नाव चोरले , पण हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांनी घडविलेले कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांची हिमंत कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते पुन्हा फिनिक्स फक्ष्याप्रमाणे भरारी घेतील तेव्हा महाराष्ट्राचे चित्र हे वेगळे दिसेल.” असं सुनिल प्रभू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
राज्यपालाच्या अभिभाषणाच्या चर्चेत सुनिल प्रभू यांनी काल सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी शिंदेसह भाजपच्या आमदारांना घेरलं. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात महाविकास आघाडीने केलेली कामे नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मुंबई-नागपुर, पुणे मेट्रो प्रकल्प, वस्त्रउद्दोग धोरण, उद्योजकांसाठी एक खडकी योजना किंवा समृद्धी महामार्ग, नीती आयोग, सागर सेतू, मराठा ओबीसी अनुदान या सर्व योजना त्यांनी वाचून दाखवल्या.
Read also
- हेही वाचा..““विधीमंडळ नव्हे चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ “,राऊतांवर हक्कभंगाची कारवाई?
- हेही वाचा..“पहाटेच्या शपथविधीबाबत माझ्या आत्मचरित्रात लिहिणार, तेव्हा वाचा”, अजित पवारांचं सुचक विधान
- हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?
- हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”