मुंबई : विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानंतर सभागृहात संजय राऊतांविरोधात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंगचा प्रस्ताव देण्यात आला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
भाजप आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, आणि शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी देखील नाराजी व्यक्त करत त्यांचं वक्तव्य परत एकदा तपासून पाहण्याची विनंती केली. “कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला विधीमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. पण या बातमीत तथ्य आहे का? हे देखील तपासले पाहिजे.” त्यावर काॅंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य तपासून पाहण्याची विनंती केली.
हेही वाचा..“बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला
तर विधानसभेत भरत गोगावले यांनीही संजय राऊतांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्षेप घेत त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह दहा मिनिटे तहकुब करण्याचा निर्णय घेतला. तर मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं सांगत संजय राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम राहिलेत.
हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
दरम्यान, शिवसेना संसदीय पक्षाच्या गटनेते पदावरून संजय राऊतांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तशा आशायचे पत्र देखील शिवसेनेकडून काढण्यात आले आहेत. त्यावर बोलतांना संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ केल्याचा वक्तव्य केलं. “विधीमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, अशी अनेक पदं बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. पदं गेलीत, पद परत येतील, आम्हाला पक्ष महत्वाचा आहे.” असं वक्तव्य संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.
Read also
- हेही वाचा..“पहाटेच्या शपथविधीबाबत माझ्या आत्मचरित्रात लिहिणार, तेव्हा वाचा”, अजित पवारांचं सुचक विधान
- हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?
- हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
- हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी