मुंबई : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या आमदार सरोज अहिर ह्या आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल झाल्या. परंतु विधान भवनातील हिरकणी कक्षाची वाईट अवस्था पाहून त्यांनी उरर्वित अधिवेशनावरच बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर राज्यातील इतर आमदारांनीही त्याच्यावर भाष्य करत राज्य सरकारवर जहरी टिका केली. यातच आज पुन्हा एकदा सरोज अहिरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
सरोज अहिरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानभवनात हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिला. तसेच यावेळी त्या म्हणाल्या की, प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी अशी सुविधा उपलब्ध झाली तर प्रत्येक महिला आनंदी होईल. तसेच निधीवाटपात केवळ शिंदे गट आणि भाजपमधील सदस्यांच्या मतदारसंघाचा विचार न करता सर्वसमावेश विकास कसा होईल याची दखल राज्य सरकारने घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
Read also
- हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
- हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं
- हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
- हेही वाचा.“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार
- हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी