मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस विरोधकांनी कांदा, कापसाच्या घसरलेल्या भावावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यातच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. याआधीच विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुत्र्यांची भेट घेतली.
हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो सत्यजीत तांबे यांनी ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सदिच्छा भेट घेतली. जुनी पेन्शन, सरकारी नोकर भरती, औद्योगिक वसाहतींच्या काही समस्या, क्रिडा विद्यापीठ सारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा केली, साहेबांनी लवकरच या संदर्भात वेळ देऊन स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
तसेच सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विधानभवनात भेट घेतली. माझे आजोबा स्वत.स्वांतत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे आत्मचरित्र त्यांना भेट म्हणून दिले. त्याचबरोबर जुनी पेन्शन, जलसंपदा विभागातील जागा भरती, सरकारी नोकर भरती, येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सदिच्छा भेट घेतली.
जुनी पेन्शन, सरकारी नोकर भरती, औद्यगिक वसाहतींच्या काही समस्या, क्रिडा विद्यापीठ सारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा केली, साहेबांनी लवकरच या संदर्भात वेळ देऊन स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले आहे. @mieknathshinde pic.twitter.com/MknWeOX5Z6— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 28, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
माझे आजोबा स्व.स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे आत्मचरित्र त्यांना भेट म्हणून दिले.
त्याचबरोबर जुनी पेन्शन,जलसंपदा विभागातील जागा भरती,सरकारी नोकर भरती,येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केली. pic.twitter.com/pV3EfsNvJz— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 28, 2023
Read also
- हेही वाचा..“ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे,” मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आपचं जोरदार आंदोलन
- हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल
- हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
- हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
- हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल