पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणुक पार पडली. यापोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर मैदानात उभे आहेत. या पोटनिवडणुकाची निकाल येत्या ०२ मार्चला लागणार आहे. परंतु त्याआधीच कसब्यात हेमंत रासने यांचे पोटनिवडणुकीत विजय झाल्याचे पोस्टर लागले आहेत. त्यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..““मला फसवण्यासाठी माझ्या गाडीत गांजा, चरस अफू..” गिरीश महाजनांचा मोठा दावा
हेमंत रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे पोस्टर कसब्यात लागले आह. हे पोस्टर भाजप युवा मोर्चा पुणे शहाराध्यक्ष प्रथमेश सतिश पाठक यांनी लावले आहेत. त्यामुळे निकालाआधीच कसब्यात विजयाचे पोस्टर लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहेत. त्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य
कसब्यात लागलेल्या पोस्टरवरून सुषमा अंधारे यांनी भाजपवर टिका केली आहे. निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सकाळी सकाळी रासने जिंकण्याची ही प्लेक्सबाजी निवडणुक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आणणारी नाही का ? असा सवाल करीत या प्लेक्स बाजीचा अर्थ काय काढायचा, असा सवालही सुषमा अंधारे यांनी भाजपला केला आहे. तसेच तथाकथिच महाशक्तीचा मनसबदाऱ्यांनी कृपया आम्हाला सांगावे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीकरीता ५०. ०६ टक्के मतदान झालं. काही अपवाद वगळता कसब्यात सुरक्षितपणे मतदान पार पाडलं. यातच भाजपने या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करत धंगेकरांनी मतदानाच्या आदल्या दिवशी आंदोनल केलं. त्यानंतर त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेऊन भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तर हेमंत रासने यांच्यावरही निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय?
सकाळी सकाळी रासने जिंकण्याची ही फ्लेक्सबाजी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आणणारी नाही का?
या फ्लेक्स बाजीचा अर्थ काय काढायचा, तथाकथित महाशक्तीच्या मनसबदाऱ्यांनी कृपया आम्हाला सांगावे.@SaamanaOnline @ShivSenaUBT_ @ShuklaRajiv pic.twitter.com/gGI3uh34bo— SushmaTai Andhare (@andharesushama) February 28, 2023
Read also
- हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
- हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
- हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल
- हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका
- हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा