मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप बजावला आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा विधान परिषदेकडे वळवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य
शिवसेना पक्षाच्या बैठकीत विधान परिषदेचे आमदार विप्लव गोपीकिशन बाजोरी या यांची शिवसेना पक्षाच्या विधानपरिषद प्रतोद निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी विधान परिषद उपसभापती यांना कळवली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी काही काळात ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांना याचा धोक्का निर्माण झाला आहे.
हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या ५५ आमदारांना व्हिप बजावला आहे. यातच सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ठाकरे गटाच्या आमदारांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र ठाकरे गटातील आमदारांनी आमचा व्हिप बजावला नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
दरम्यान, यातच सत्तासंघर्षाच्या याचिकांवर आजपासून सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी मागील सुनावणीत युक्तिवाद केला होता. त्यात आता शिंदे गटाच्या वकिलांकडून न्यायालयात युक्तिवाद करण्यात येत आहे.
Read also
- हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
- हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल
- हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका
- हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
- हेही वाचा..““मला फसवण्यासाठी माझ्या गाडीत गांजा, चरस अफू..” गिरीश महाजनांचा मोठा दावा