पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याच घरात पैसे वाटले. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करा. तसेच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मतदानाचा प्रचार संपल्यानंतरही त्यांनी कसब्यात पैसे वाटले. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी आता कसबा पेठ पोटनिवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. काल त्यांच्यावर अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्यांनी उलट भाजप आणि सरकारवर आरोप केलेत.
हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?
काल कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीकरीता ५०. ०६ टक्के मतदान झालं. काही अपवाद वगळता कसब्यात सुरक्षितपणे मतदान पार पाडलं. यातच भाजपने या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करत धंगेकरांनी मतदानाच्या आदल्या दिवशी आंदोनल केलं. त्यानंतर त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेऊन भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
रवींद्र धंगेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. पैसे वाटप केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करावी. तसेच प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी देखील निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करत रात्री उशिरापर्यंत त्यांनी कसब्यातील विविध भागात लोकांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांच्यावरही निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच या पोटनिवडणुकीत मी १५ ते २० हजार मतांनी निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Read also
- हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
- हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
- हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
- हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल