पुणे : कसबा पेठ आणि चिचंवड पोटनिवडणुकीसाठी काल काही अपवाद वगळता सुरळितपणे मतदान पार पाडलं. कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 50.06 टक्के आणि चिंचवड पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झालं आहे. या पोटनिवडणुकांमध्ये आपणच गुलाल उधळणार असा दावा उमेदवारांकडून केला जात आहे. या निवडणुकांची मतमोजणी येत्या ०२ मार्चला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता आता कार्यकर्त्यांसह राजकीय नेते,महाराष्ट्रातील जनतेला लागून राहिली आहे.
हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर लढत झाली तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच लाख ८६ हजार पैकी ९५४ मतदानापैकी 278374 मतदान झालं होतं. त्यातच आताच्या पोटनिवडणुकीत २८७१४५ इतकं मतदान झाल असून मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे याचा फायदा आता कुणाला होणार? ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
तर दुसरीकडे कसब्यात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत २ लाख ७५ हजार ६७९ पैकी १,५०,०९३ मतदारांनी मत दिलं होतं. याची टक्केवारी 51.63 आहे. मात्र या पोटनिवडणुकीत कसब्यात 50.06 टक्के मतदान झालं आहे. म्हणजे मतदानाचा टक्का थोडा घसरला आहे. त्यामुळे याचा फटका कुणाला बसणार, त्याचीही चर्चा सध्या रंगली आहे.
हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रवीवारी अपवाद वगळता, शांततेत, सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरूष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असून या पोटनिवडणुकीत ५०. ४७ टक्के इतके सरकारी मतदान झाले, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
Read also
- हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
- हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”
- हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
- चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा
- हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल