पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवडमधील प्रमुख उमेदवारांनी सकाळी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही विधानसभेतील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यातच महाविकास आघाडी आणि भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये प्रमुख लढत असून आज त्यांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
हेही वाचा..“पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीकडून नाना काटे तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे मैदानात आहेत. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कसब्यात भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं भविष्य मत पेटीत बंद होणार आहे. याचा निकाल येत्या ०२ मार्चला लागणार आहे.
हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. दुसरीकडे कसबा पेठ विधानसभा मतदार संघात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० केंद्रावर मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी १२५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील १३५ आणि चिंचवड मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्हायधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून संपुर्म मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत.
हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
कसब्यात पुरूष मतदारपेक्षा महिला मतदार जास्त असून याठिकाणी महिलांच्या हातात आपला कसबा आहे. कसब्यात महिला मतदार १ लाख ३८ हजार ५५० आहेत. तर पुरूष मतदार १ लाख ३६ हजार ८७३ आहेत. तर तृतीयपंथी मतदार ५ आहेत. एकूण मतदार केंद्र ७६ असून बुथ संख्या २७० आहे. व ९ मतदार केंद्र संवेदशील म्हणून घोषीत करण्यात आले आहेत.
Read also
- हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
- हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा