पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी खालची पातळी गाठली असल्याची टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यावर आता एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचं सांगत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
रामचरीत जाळणाऱ्या समाजवादी पार्टीकडे उद्धव ठाकरे गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे आता कोणतं हिंदुत्व शिल्लक राहिलं आहे. त्यांनी अगदी खालची पातळी गाठली आहे. तसेच ओवसी त्यांच्याकडे येणार नाहीत. परंतू उद्धव ठाकरे हे त्यांच्याकडे नक्कीच जाणार. अशी टिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी दोन शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंची बोलती बंद केली.
हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
भाजपसारखे आम्ही ओवसीकडे युतीची मागणी करणारे आम्ही लाचार नाही. ओवीसीच्या विरोधातील सर्व मुस्लिम समाज आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिला आहे. आम्ही त्यांच्याकडे कशासाठी जाणार ? असा सवाल करीत भाजपची बी टीम म्हणून एमआयएम काम करीत आहे. असल्याचं त्यांनी सांगितलं. बावनकुळेंनी असं काही उलटं सुलटं बोलू नये. त्यांनी आपला तोंड सांभाळावं. अशा इशाराही खैरे यांनी दिला आहे.
Read also
- हेही वाचा..रात्रीस खेळ चाले..!दगडी चाळीतील डॉन अरूण गवळींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंंच्या बाजूने वारे फिरले
- हेही वाचा..” 24 तासाचा प्रवास करून थेट तरूणीने लंडनहून पुणे गाठलं,” मतदान कुणासाठी? थेट नावच सांगितलं
- हेही वाचा..“कसबा आणि चिंचवडवासियांनो, मोठ्या संख्येने मतदान करा”, फडणवीसांचं पुण्यातल्या मतदारांना आवाहन
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली