पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या सकाळपासून सायंकाळी पर्यंत या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यातच भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यानंतर भाजपने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन धंगेकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा…“समोर पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं धंगेकरांचं काम”
यानंतर राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावरून भाजपवर त्यांनी निशाणा साधला आहे. कित्येक दशके कसब्यात भाजपची सत्ता होती. वेळीच विकासाची गंगा वाहिली असती तर आज मतांसाठी पैशांचा पाऊस पाडावा लागला नसता. असो. तरीपण कसब्यात येणार तर धंगेकरच. असं ट्विट प्रशांत जगताप यांनी केला आहे.
हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
रवींद्र धंगेकरांच्या आरोपानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगकेर यांनी फक्त स्टॅंडबाजी केली असून त्यांनी आपला प्रचार करण्याचा नवीन प्रयत्न केला आहे. रवींद्र धंगेकर यांच्याकडून निवडणुकीच्या आचारसंहितेचं भंग केलं आहे. ईश्वर त्यांना सदबुद्धी देवो. असा टोलाही त्यांनी लगावला.
Read also
- “मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
- “पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
- हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
- हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
- हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी