पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुक आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्याआधी या निवडणुकांसाठी भाजपकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप काॅंग्रेसचे नेते आणि उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी करण्यात आला आहे. याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही आले आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
महाराष्ट्रात मागील मोठा काळ पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत बारामती-पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होतं हे पुराव्यासह उघड झालं. पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यांसह उघड झाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..““उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते, त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे, त्यांच्या पाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र” अरविंद केजरीवाल
कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करत धंगेकरांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रवींद्र धंगेकरांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. तर रवींद्र धंगेकरांच्या विरोधात भाजपच शिष्टमंडळांनी पोलिसांची भेट घेऊन तक्रार घेतली आहे. यावेळी आमदार माधूरी मिसाळ, माजी महापौर मुरलिधर मोहोळ, आणि भाजपचे पुणे शहाराचे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.
Read also
- हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
- हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
- हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
- हेही वाचा…“समोर पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं धंगेकरांचं काम”
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर