पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी दोन्हीही पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कसब्यात अल्पसंख्याक बैठक घेण्यात आली.
हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा, मेलेले आहेत त्यांना हजर करा, काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांची ही विधान आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत येथे बोगस मतदान घडविण्याची योजना आखली जात आहे, असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे. तसेच निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी यावेळी केली.
हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केलं जात आहे. आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात. मेलेल्यांनाही जंग साठी हाजीर करा म्हणतात. इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती. हा तर एक प्रकारे जिहादच आहे. असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”
दरम्यान, मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं सांगणार असतील तर हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतंय. त्यामुळे याचा तर निषेध आमच्याकडून होणारच. मताचं ध्रवीकरण राष्ट्रवादीकडून जे चाललं आहे. ते लोकांना चालणार नाहीच, परंतु आम्ही हे खपवून घेणार नाहीत. अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय आणि दुबई,सौदीतून मतदार आणा म्हणतात,मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात…
इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…
हा तर एकप्रकारे जिहादच..! https://t.co/1zlWYOcHzS
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 23, 2023
Read also
- हेही वाचा..“भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान म्हणणायची राष्ट्रवादीत पंरपरा,” देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं
- हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर
- हेही वाचा…“शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”
- हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
- हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,