मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट राज्यपालांच्या अधिकारांवर बोट ठेवला. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नसतांनाही राज्यापालांनी त्यांना शपथविधी करण्यासाठी बोलवलं. तो चुकीचा होता. असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनाही आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद केला आहे. या सर्व सुनावणीत न्यायालयाने देखील महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे.
हेही वाचा..““भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा दवेंचा प्रचार” ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षांचा दवेंवर आरोप
राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी चुकीची होती. भाजपकडे फक्त १०६ आमदार असून अपक्ष आमदारांसह त्यांच्याकडे फक्त १२७ जणाचं बहुमत आहे. अपात्रतेचा मुद्दा निकाली लागल्यावरच राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय घ्यायला हवा होता. भाजपने दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी आक्षेप नोंदवला.
हेही वाचा.मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगतापांचं मोठं योगदान”, अश्विनी जगतापांच्या प्रचारसभेत शिंदेंचं विधान
सिब्बल हे कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आक्षेप जेठमलानी यांनी केला. त्यावर गोगावले यांची केलेली प्रतोद म्हणून निवड योग्य आहे का? असा सवाल सिब्बल यांनी केला. त्यानंतर सिब्बल यांनी थेट राज्यपालांचे अधिकार आणि भुमिकेवर बोट ठेवले. तर सिब्बल यांचे मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढे नेले. राज्यपालांनी नैतिकता पाळायला हवी होती. असं मनु सिंघवी यांनी म्हटलं.
हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा
या सर्व सुनावणीनंतर न्यायालयाने महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता ३९ आमदारांनी हरला असता तर आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती. त्यामुळे तुम्ही राजीनामा दिल्यानं तो अधिकार गमावला आहे. त्यावर आता परिस्थिती जैसे थे कशी करणार ? असा उलट सवाल न्यायालयाने केला. जे झालं ते आता आम्ही बदलू शकत नाही, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
Read also
- हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”
- हेही वाचा.“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”
- हेही वाचा.“प्रशांत जगतापांचं ‘ते’ विधान वाढवत आहे, धंगेकरांची डोकेदुखी..! काय बोलून गेले ?
- हेही वाचा..“महानगरपालिकेसाठी चिंचवडची पोटनिवडणुक ही आमची लिटमट टेस्ट”, पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा”, ठाकरें सभेतून सगळ्यांचेच हिशोब चुकते करणार?