पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय नेत्यांकडून कसून प्रचार केला जात आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत असून येत्या ०२ मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीसोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. यातच आता या पोटनिवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्धे केले आहेत. यातच अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख यांनी आपला जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला आहे. त्यामुळे सध्या याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
हेही वाचा.मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगतापांचं मोठं योगदान”, अश्विनी जगतापांच्या प्रचारसभेत शिंदेंचं विधान
चिंचवड पोटनिवडणुकीकरीता सिद्धिक शेख सफरचंद चिन्ह घेऊन निवडणुक लढवित आहेत. त्यांनी आपल्या मतदार संघातील लोकांसाठी १२ महत्तावंच आश्वासन दिलं आहे. त्यासाठी त्यांनी थेट आपला जाहीरनामा स्टॅंम्प पेपरवर छापला आहे. तसेच निवडणुक आल्यास ही आश्वासने पुर्ण करू शकलो नाही तर माझ्याविरोधात खटला दाखल करा. असंही त्यांनी त्यात म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी थोडेच दिवस बाकी असतांना हा जाहीरनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा
त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात खालील गोष्टींचा उल्लेख केला आहे.
१) पिंपरी चिचंवड शहरातील अनाधिकृत बांधकाम बाधितांचा प्रश्न व शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणार .
२) शासकीय व खासगी दवाखान्यातून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी विधानसभेत ” रुग्ण हक्क कायदा ” मांडणार .
३) खासगी शाळांमधून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवून , सरकारी शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार .
४ पिंपरी चिंचवड शहरातील पवना,इंद्रायणी ,मुळा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविणबर
५) चिचंवड मतदार संघातील वाकड , हिंजवडी ,पिंपळे सौदागर ,काळेवाडी ,डांगेचौक यांसारख्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करून मोठी वाहने , बसेस पार्किंग साठी आरक्षित जागेमध्ये बहुमजली वाहनतळ उभे करून वाहतूक प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार .
६) चिचंवड विधानसभा मतदार संघातील दत्तनगर , सिद्धार्तनगर ,अशोकनगर , एम. बी .कॅम्प , काळाखडक , म्हातोबा नगर , अण्णाभाऊ साठेनगर इत्यादी झोपडपट्यांमधील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन झोपडपट्टी धारकांचे मूलभूत प्रश्न सोडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार
७) पिंपरी चिचंवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रकल्पासाठी जागा व अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करून कचरा प्रश्न सोडणार आहे.
८) चिचंवड मतदार संघामध्ये मराठवाड्यातील बीड ,नांदेड , उस्मानाबाद , लातूर , जालना , औरंगाबाद , परभणी , इत्यादी ठिकाणाहून कामासाठी आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर इथेच स्थायिक झालेले आहेत . मराठवाड्यातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार .
९) चिचंवड मतदार संघातील मुस्लिम बांधवाना २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला कब्रस्तानचा प्रश्न मार्गी लावणार
१०) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक कार्य करणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख व मानवतावादी समाजसेविका मदार तेरेसा यांचे स्मारक उभे करणार
११) मुस्लिम , ख्रिश्चन ,बौद्ध ,जैन यांसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांवर वारंवार होणारे हल्ले व अल्पसंख्यांकावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात अल्पसंख्यांक अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायदा विधानसभेत मांडणार
१२) सर्व समाजातील थोर महापुरुषांची होणारी बदनामी रोखण्यासाठी सभागृहात ” महापुरुष बदनामी प्रतिबंधात्मक कायदा ” करण्यासाठी प्रयत्न करणार
हेही वाचा..“पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत
दरम्यान, सिद्धिक शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील आपल्या मतदार संघात राबविले आहेत. यामध्ये शहरातील विविध भागांमध्ये बेटी बचाव अभियान, मंदिर, सार्वजनिक पुतळे, मस्जिद परिसर अशा ठिकाणी स्वच्छता अभियान, प्रौढ साक्षरता अभियान, गुन्हेगारी मुक्त शहर अभियान, स्वच्छ व सुरक्षित शहर अभियान प्रबोधनकार शिबिरांचे आयोजन, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र दौरा, कलम ३५३ विरोधात शिबिरे आदि काम केले आहेत.
Read also
- हेही वाचा.“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”
- हेही वाचा.“प्रशांत जगतापांचं ‘ते’ विधान वाढवत आहे, धंगेकरांची डोकेदुखी..! काय बोलून गेले ?
- हेही वाचा..“महानगरपालिकेसाठी चिंचवडची पोटनिवडणुक ही आमची लिटमट टेस्ट”, पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा”, ठाकरें सभेतून सगळ्यांचेच हिशोब चुकते करणार?
- हेही वाचा..““भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा दवेंचा प्रचार” ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षांचा दवेंवर आरोप