पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. येत्या २६ फेब्रवारी रोजी मतदान होत असून प्रचार करण्यास अवधी शिल्लक बाकी आहे. यातच भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या वेळी राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे या विधानामुळे धंगेकरांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत
प्रशांत जगताप म्हणाले की, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं देशातील सर्वात मोठ्या मुख्यालयामधील मोतीबाग ही कसबा पेठ मतदार संघात आहे. जर या मतदार संघातील भाजपचा उमेदवार हरला तर संपुर्ण भारतात असा संदेश जाईल की, भारतात आरएसएसचं दोन मुख्यालय असून त्यात संघाचं काम केलं जात आहे. त्यात पहिल्यांदा रेशीमबाग हरलेत, अन् दुसऱ्यांदा मोतीबाग हरतील. असं राष्ट्रवादीचे पुणे शहाराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विधान केले आहे.
हेही वाचा…“राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ,” ठाकरे गटाच्या वकिलांनी असं का म्हटलं?
दरम्यान, अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नागपुर आणि अमरावती मधील भाजपने आपली जागा गमावली. त्यामुळे चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक भाजपसाठी आता प्रतिष्ठेची ठरली आहे. यासाठी भाजप दिवस रात्र मेहनत घेतांना दिसत आहेत. यातच प्रशांत जगतापांनी केलेल्या वक्तव्यावरून पुण्यातील जनता नाराज होण्याची शक्यता अधिक दिसून येत असून याचा फटका धंगेकरांसाठी बसण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..“महानगरपालिकेसाठी चिंचवडची पोटनिवडणुक ही आमची लिटमट टेस्ट”, पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा”, ठाकरें सभेतून सगळ्यांचेच हिशोब चुकते करणार?
- हेही वाचा..““भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा दवेंचा प्रचार” ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षांचा दवेंवर आरोप
- हेही वाचा.मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगतापांचं मोठं योगदान”, अश्विनी जगतापांच्या प्रचारसभेत शिंदेंचं विधान
- हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा