पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. प्रचारासाठी अवघ्या दोन दिवस शिल्लक असतांना भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार ताकद लावली जात आहे. आज चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस तर कसब्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. त्यामुळे आज दोन्ही नेते आपापल्या सभेतून कुणावर हल्लाबोल करणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा..“शरद पवार असेपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकत नाही”
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर रात्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपळे सौदागर येथे जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी रोहित पवार, आदिती तटकरे मैदानात उतरून प्रचार करणार आहेत. यामुळे चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलचं तापणार आहे.
हेही वाचा..निवडणुक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाही, परंतु ‘या’ घटनेत ठाकरेंना मोठा दिलासा
दुसरीकडे कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहेत. त्यामुळे कसब्यात आदित्य ठाकरे आपल्या प्रचार सभेतून कुणावर हल्लाबोल करणार? सभेत नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
Read also
- हेही वाचा..““भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा दवेंचा प्रचार” ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षांचा दवेंवर आरोप
- हेही वाचा.मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगतापांचं मोठं योगदान”, अश्विनी जगतापांच्या प्रचारसभेत शिंदेंचं विधान
- हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा
- हेही वाचा..“पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत
- हेही वाचा…“राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ,” ठाकरे गटाच्या वकिलांनी असं का म्हटलं?