पुणे : लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर याठिकाणी राजेशाही, घराणेशाही चालणार नाही. लोकशाहीत भावनेला आधार नाही. त्यामुळे कुटुंबातीलच उमेदवाराला निवडून द्यायचं असतं तर यासाठी कायदा झाला असता. परंतु याठिकाणी निवडणुक आयोगाच्या नियमावर, संविधानावर कारभार चालतो. त्यामुळे आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पोटनिवडणुक लढवित आहे. यातच दुसऱ्या बाजूला उमेदवार देऊ नका सांगताहेत. परंतु त्यांच्या पडद्याआड वेगळ्या सेटलमेट झालेले असतात. असं ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केलं. ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ,” ठाकरे गटाच्या वकिलांनी असं का म्हटलं?
येणाऱ्या महानगरपालिकेसाठी या पोटनिवडणुकीतून आम्ही लिटमस टेस्ट घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिंचवडमध्ये बौद्ध समाज मोठा आहे. याठिकाणी अशा अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक दलित तरूणांना अडचणीत पकडलं आहे. त्यामुळे आता आम्हाला मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणुकीत आम्ही सगळी ताकद पणाला लावू. असंही दिपक केदार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“शरद पवार असेपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकत नाही”
दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर चिंचवड पोटनिवडणुक लागली आहे. भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे देखील मैदानात उतरले आहेत. यातच ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून किशोर आत्माराम काशीराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत त्यांना बट हे निवडणुक चिन्ह देण्यात आलं आहे.
Read also
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा”, ठाकरें सभेतून सगळ्यांचेच हिशोब चुकते करणार?
- हेही वाचा..““भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा दवेंचा प्रचार” ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षांचा दवेंवर आरोप
- हेही वाचा.मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगतापांचं मोठं योगदान”, अश्विनी जगतापांच्या प्रचारसभेत शिंदेंचं विधान
- हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा
- हेही वाचा..“पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत