पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय नेत्यांकडून कसून प्रचार केला जात आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत असून येत्या ०२ मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीसोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. यातच आता या पोटनिवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्धे केले आहेत. यातच अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख यांनी आपला जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला आहे. त्यामुळे सध्या याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
हेही वाचा.“प्रशांत जगतापांचं ‘ते’ विधान वाढवत आहे, धंगेकरांची डोकेदुखी..! काय बोलून गेले ?
सिद्धिक शेख म्हणाले की, पिंपरी चिचंवड शहर हे कामगार नगरी आहे . याठिकाणी अनेक जिल्ह्यातीतून कामानिमित्त नागरिक स्थायिक झाले . चिचंवड मतदार संघात जालना , नांदेड ,उस्मानाबाद , बीड , लातूर , परभणी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यास आहेत . पिंपरी चिचंवडच्या जडणघडणीत मराठवाड्यातील लोकांचा मोठा हातभार आहे. येथील सांस्कृतिक , राजकीय , सामाजिक , आर्थिक क्षेत्रात मराठवाड्यातील लोक आपले योगदान देत आहेत.
हेही वाचा..“महानगरपालिकेसाठी चिंचवडची पोटनिवडणुक ही आमची लिटमट टेस्ट”, पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम
मराठवाड्यातील येथे स्थायिक झालेले आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या गवंडी , मजूर , फळविक्रेते , भाजी विक्रेते अशा घटकांना संघटित करणे व मराठवाड्यातील सर्व लोकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाडा भवन उभे करणार असल्याचा निर्धार अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख यांनी केला आहे. त्यामुळे सिद्दिक शेख यांनी जनतेला आव्हान केले आहे कि, २६ नंबर सफरचंद चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा .
Read also
- हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,
- हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
- हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
- हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”
- हेही वाचा.“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”