पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी दोन्हीही पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कसब्यात अल्पसंख्याक बैठक घेण्यात आली.
हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा”, ठाकरें सभेतून सगळ्यांचेच हिशोब चुकते करणार?
या बैठकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..““भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा दवेंचा प्रचार” ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षांचा दवेंवर आरोप
याबाबत केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट केले असून निवडणूक आयोगाकडे एक मोठी मागणी देखील केली आहे. उपाध्ये यांच्या ट्वीट मध्ये असं म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा, मेलेले आहेत त्यांना हजर करा, काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांची ही विधान आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत येथे बोगस मतदान घडविण्याची योजना आखली जात आहे, असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे. तसेच निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी यावेळी केली.
Read also
- हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
- हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”
- हेही वाचा.“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”
- हेही वाचा.“प्रशांत जगतापांचं ‘ते’ विधान वाढवत आहे, धंगेकरांची डोकेदुखी..! काय बोलून गेले ?
- हेही वाचा..“महानगरपालिकेसाठी चिंचवडची पोटनिवडणुक ही आमची लिटमट टेस्ट”, पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम
#Modi, #Rss ला पराभूत करण्यासाठी #दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा
मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत @PawarSpeaks उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत. कॅाग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पणे आखली जात आहे @ECISVEEP
दखल घ्यावी pic.twitter.com/HWMs1UCiZL— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 23, 2023