मुंबई : राज्यात सध्या सत्तासंघर्ष आणि पहाटेचा शपथविधीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांत भिडले आहेत. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपत राजवट उडली नसती. असं अप्रत्यक्ष वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यावरून विरोधकांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले असता, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुगली टाकत भाजपवरच पलटवार केला आहे.
हेही वाचा..“महानगरपालिकेसाठी चिंचवडची पोटनिवडणुक ही आमची लिटमट टेस्ट”, पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम
शरद पवारांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारले असता. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ती बातमी आजच टिव्हीवर पाहिली. यावरून मला दोन प्रश्न पडले की, भाजपकडे १०६ आमदारांचं पाठबळ होत, तरी देखील त्यांनी ४० आमदारांची संख्या असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री का केलं. ? असा सवाल करीत महाराष्ट्रातील जनता सर्व काही पाहत आहे. त्याचा हिशोब जनताच घेईल. असा टोलाही सुळे यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा”, ठाकरें सभेतून सगळ्यांचेच हिशोब चुकते करणार?
त्याचबरोबर सध्या देशात आणि राज्यात महागाई, बेरोजगारी आणि इतर मुद्दे तापलेलं असताना आपल्या मुख्यमंत्र्यांना याचं काही देणघेण नाही. यातच माहितीच्या अधिकाराखाली मुख्यमंत्र्यांचं सहा महिन्याचं घरातील जेवणाचं बील ६ कोटी आल्याचंही सुळे यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
- हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
- हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”
- हेही वाचा.“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”
- हेही वाचा.“प्रशांत जगतापांचं ‘ते’ विधान वाढवत आहे, धंगेकरांची डोकेदुखी..! काय बोलून गेले ?