पुणे : पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्यावर पहाटेच्या शपथविधीबाबत केलेलं वक्तव्य शरद पवार सारख्या नेत्यांकडून अपेक्षित नाही. असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुधीर मुनगंटीवार आणि भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”
छगन भुजबळ म्हणाले की, भाजप जे खोटं करीत आहे. तितकं खोटं तर कुणीच करू शकत नाही. खोटं बोलणं, खर बोलणाऱ्यांना त्रास देणं. विरोधकांचं ऐकून घेणं असं तुम्ही म्हणायचं. अन् तुमच्याविरोधात जे जे सत्य बोलतात. त्यांची तोंड तुम्ही बंद करण्याचं काम करत आहेत. खोटं तर तुम्ही करता, पवार साहेब फक्त राजकारणीतील खेळी खेळताहेत. त्याठिकाणी तुम्ही राष्ट्रपती राजवट बसवली. तो खोटारडेपणा नव्हता का? असा सवालही भुजबळांनी केला.
हेही वाचा.“प्रशांत जगतापांचं ‘ते’ विधान वाढवत आहे, धंगेकरांची डोकेदुखी..! काय बोलून गेले ?
काट्याने काटा काढायचा, ते पवार साहेब करीत आहेत. नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार आहे. असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी छगन भुजबळ चिंचवड मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Read also
- हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
- हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,
- हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
- हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
- हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”