मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे आधी जयंत पाटील यांचे वाढदिवसाच्या दिवशी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले, आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरच अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील पोस्टर लागले आहेत.
हेही वाचा..” चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा थेट स्टॅंम्प पेपरवर छापला, अश्वासनं पुर्ण करू शकलो नाहीतर खटला भरवा”
मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मागील काही दिवसापासून भावी मुख्यमंत्री असल्याचे पोस्टर बघायला मिळत आहेत. जयंत पाटील, अजित पवार आणि आता महाराष्ट्राची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असा उल्लेख करत पोस्टर लागले आहेत. त्यामुळे हे पोस्टर आता कोण लावतंय. याची तपासणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. यातच कार्यकर्त्यांना सांगून सुप्रिया सुळे यांनी पोस्टर काढण्यास सांगितले.
हेही वाचा…“कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार”
जयंत पाटील यांचा पोस्टर कार्यकर्त्यांनी लावला होता. परंतु अजित दादा आणि माझे पोस्टर सेम होते. यात अजित दादा आणि माझ्या फोटोवर कुणाचंही नाव नव्हतं. त्यामुळे हे फोटो कोण लावतंय. त्याबाबत पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान म्हणून सांगण्याची राष्ट्रवादीमध्ये अशी सांगण्याची पद्धत आहे. ते असं सांगत असतात. माझ्या अनुभवातून मी खुप काही शिकलो. त्यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं होतं का ? असा सवाल करत ज्याला ज्याला भावी वाटतोय. त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”
- हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
- हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,
- हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
- हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,