पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचं भविष्य आज मत पेटीत बंद होणार आहे. आज सकाळपासून दोन्ही विधानसभा मतदार संघात नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. कसबा पेठ आणि चिंचवडमधील प्रमुख उमेदवारांनी सकाळी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही विधानसभेतील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
कसबा आणि चिंचवडवासियांनो, तुम्ही मतदान केले असलेच..! नसेल केले तर मोठ्या संख्येने मतदान करा. आपले कुटुंबीय, मित्रपरिवार यांनाही मतदान करायला सांगा. लक्षात ठेवा, प्रत्येक मत महत्वाचे असते. लाखो नागरिकांचे भवितव्य घडविणारे असते. लोकशाही प्रक्रियेला आणखी भक्कम करणारे असते. असं ट्विट करत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. दुसरीकडे कसबा पेठ विधानसभा मतदार संघात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० केंद्रावर मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी १२५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील १३५ आणि चिंचवड मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्हायधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून संपुर्म मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत.
अजिबात विश्वास ढळमळीत झालेला नाही.
हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
दरम्यान, चिंचवडमध्ये तिरंगी लढत असून यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचं भविष्य मत पेटीत बंद होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कसब्यात महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्या प्रमुख लढत आहेत. या पोटनिवडणुकांचा निकाल येत्या ०२ मार्चला लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ते पाहणं महत्ताचे ठरणार आहे.
कसबा आणि चिंचवडवासियांनो,
तुम्ही मतदान केले असेलच!
नसेल केले तर मोठ्या संख्येने मतदान करा, आपले कुटुंबीय,मित्रपरिवार यांनाही मतदान करायला सांगा.
लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे असते…
लाखो नागरिकांचे भवितव्य घडविणारे असते…
लोकशाही प्रक्रियेला आणखी भक्कम करणारे असते…#Pune pic.twitter.com/6qZPqAYCie— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2023
Read also
- मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
- हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
- “पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”