पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज मतदारांनी सकाळीच बाहेर पडून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्का बजावला. चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत असून भाजपकडून अश्विनी जगताप , महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आज सकाळीच अश्विनी जगताप यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर मतदान केलं. तसेच त्यांनी मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन केलं.
हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
मतदानाचा आपल्याला सार्वभौम अधिकार असून तो सगळ्या मतदारांनी बजावावा. सगळ्यांनी बाहेर पडून विकासाला मत द्यावं. असं आवाहन अश्विनी जगताप यांनी केलं. तसेच बऱ्याच वेळा साहेबांना मतदान करायचे, आज स्वत: लाच मतदान केल्याने थोडी मनाला हुरहुरही वाटली. जितका साहेबांना लोकांचा विश्वास होता, तितकाच विश्वास माझ्यावर लोकांनी गेल्या पंधरा ते वीस दिवसांत दाखवला. साहेब गेल्यानंतरही त्यांचा अजिबात विश्वास ढळमळीत झालेला नाही.
हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
साहेबांवर ज्यांचं प्रेम होतं. त्यामुळे थोडी तर सहानुभूती असणारच, परंतु मी तर विकासाचा मुद्दा प्रचारामध्ये उचलून धरला होता. अशीही प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली. चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान झालं आहे. चिंचवड मतदार संघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हयाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्ह्याधिकारी कार्यालयातील नियंत्रम कक्षातून संपुर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.
Read also
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
- हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
- “पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
- हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा