पुणे : चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना फोडण्याचं ज्यांनी ज्यांनी काम केलं. त्यांच्यासगट बरोबर असलेले सर्व आमदार निवडणुकीत पराभूत झालेत. त्यात नारायण राणे यांना तर एका बाईनं पाडलं. असा टोला अजित पवार यांनी राणेंना लगावला. त्यावर माझ्या नादाला लागू नका. नाही तर बारामतीत येऊन बारा वाजवेन असा इशारा राणेंनी अजित पवार यांना दिला. त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली.
हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
ज्या ज्या लोकांनी शिवसेनेला फोडण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यातच आमच्याबरोबर असणाऱ्या छगन भुजबळांनी देखील १९ लोकांना फोडलं. पुढच्या निवडणुकीत भुजबळांसोबत सगळ्याच नेत्यांना पराभूत करण्याचं काम जनतेनं केलं. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सगळे पडले. त्यात नारायण राणे तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा बांद्रात पडले. तिथे तर एका बाईनं पाडलं. असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…“समोर पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं धंगेकरांचं काम”
अजित पवारांच्या टिकेला नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांना बारामतीच्या बाहरेचं कितपत राजकारण समजतं. ते मला माहिती नाही. माझ्या नादाला लागू नका नाहीतर पुण्याला येऊन बारातमीत बारा वाजवेन. असा इशारा दिला. त्यानंतर माझं कार्यक्षेत्र पहिलं कोकणात त्यानंतर बाळासाहेबांनी मला मुंबईत पाठवलं. त्याठिकाणाहून सलग सहावेळा निवडून आलो. तर त्यावेळी काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला तिथे उमेदवारी दिली होती. असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
दरम्यान, अजित पवारांची काल चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची प्रचार सभा पार पडली. त्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेच्या बंडाळीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निशाण्यावर धरलं. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पाडले. हा. तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईनं पाडलं. बाईंन. ही त्यांची प्रत्येकाच काय परिस्थिती आहे. असा टोला अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लगावला.
Read also
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
- हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
- “पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
- हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
- हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य