मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्याने राजकीय वारे शिंदेंच्या दिशेने फिरले. सुरूवातीपासूनच अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेंची साथ सोडली. यातच आता मुंबई महापालिकेची निवडणुक होऊ घातली आहे. याच पाश्वभूमीवर मुंबईच्या भायखळ्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेंची राजकीय घोडदौड आता वेगाने सुरू झाली आहे.
हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गळवी आणि दगडी चाळीतील डॉन अरूण गवळी यांचा भाऊ प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेच प्रवेश केला. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
हेही वाचा..“पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
सहा ते सात महिन्यात बाळासाहेबांच्या विचारांचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. खरं म्हणजे मी सगळ्यांचे स्वागत करतो. हे सरकार सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे. या राज्याला पुढे घेऊन जाणारे सरकार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे. गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. अनेक महत्त्वाची कामं आहेत. कोळीवाडा डेव्हलपमेंट आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतींचा धोकादायक प्रश्न आहे. जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेत त्यांना मुंबईत परत आणण्याचे काम देखील आपले सरकार करणार आहेत. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. आज आदित्य ठाकरे यांची मुंबईत सभा होत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची देखील मुंबईत सभा होत असून मुंबई महापालिकेतील विकास कामांच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुंबईतील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/4m0fLZRBX4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 25, 2023
Read also
- हेही वाचा..” 24 तासाचा प्रवास करून थेट तरूणीने लंडनहून पुणे गाठलं,” मतदान कुणासाठी? थेट नावच सांगितलं
- हेही वाचा..“कसबा आणि चिंचवडवासियांनो, मोठ्या संख्येने मतदान करा”, फडणवीसांचं पुण्यातल्या मतदारांना आवाहन
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..