मुंबई : राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत घेऊन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राज्यात इतर प्रश्न प्रलंबित असतांना मुख्यमंत्री पोटनिवडणुकांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या आहेत. असा सवाल करत अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिकास्त्र सोडलं.
हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जनतेला सांगता आहेत. मग सह्यावाचून मंत्रालयात जवळपास ३ हजार फाईल्स धुळ खात पडून आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याकरीता ज्या फाईल्स तुंबून पडल्या आहेत. त्याच्यावर पण कधीतरी कोंबडा काढा कधी तरी? असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना चांगलचं डिवचलं आहे. त्याचबरोबर त्यांनी निवडणुक आयोगाच्या निर्णयावरूनही टिकास्त्र सोडलं.
हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
अलिकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाडीवर हल्ले होत आहेत. तसेच ठाकरे गटातील आमदारांवरांवर चौकशीच ससेमीरा सुरू झाला आहे. रासन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांना एसीबीसीच्या नोटीसा आल्या आहेत. मुश्रीफांवर छापे टाकण्यात आले. त राज्यात मोठ मोठे प्रश्न असतांना मुख्यमंत्री मात्र पोटनिवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. असा टोला अजित पवारांनी लगावला.
हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
अजित पवारांनी निवडणुक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. निवडणुक आयोगाची स्वायत्वता टिकली पाहिजे. त्यांच्याबाबत आदर कायम राहिला पाहिजे. तो टिकवण्याची जबाबदारी त्यांची देखील आहे. परंतु निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाणांसदर्भातील दिलेला निर्णय हा अतिशय पक्षपातीपणा आहे. अशी जनभावना तयार झाली आहे.
Read also
- हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
- हेही वाचा..चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा
- हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
- हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?
- हेही वाचा..“चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान केंद्रावर मोबाईचा सर्रासपणे वापर