पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवडमधील प्रमुख उमेदवारांनी सकाळी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही विधानसभेतील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यातच महाविकास आघाडी आणि भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये प्रमुख लढत असून आज त्यांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
यातच चिंचवडमध्ये ८ ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चिंचवडमधील काही मतदान केंद्रावरील मतदान रखडल्यान मतदान केंद्रांवर थांबवावे लागले. मतदान निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या टीमने ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर मतदानाला सुरळित सुरूवात झाली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकमध्ये ५१० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.
हेही वाचा..“पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
गोपीनीयय मतदान प्रक्रियेचा भंग मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटन दाबन मतदान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. यातच मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर सर्रासपणे इव्हीएम मशिनवर मतदान करतानाचे व्हिडीओ काढले जात आहेत. व्हिडीओ चित्रण करण्यास परवानगी नसतानाही हे धाडस होतेच कसे? असा सवालही उपस्थित केला जात आहे. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चिंचवड पोटनिवडणुकीत चाललंय काय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी तपासणी का करत नाहीत. या घटनेनंतर निवडणुक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
- हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..