पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांनी दोन्ही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. गेल्या मागील पंधरा ते वीस दिवसापासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. त्यात आता मतदार मत पेटीत कुणाचं भविष्य टाकणार हे येत्या ०२ मार्चला समजणार आहे.
हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
कसब्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर मैदानात उतरले. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जाहीर सभा घेतली. तर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, अजित पवारांनी रॅली काढली. यातच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंचीही सभा कसब्यात पार पडली. तर सरूवातीच्या काळात सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण नाना पटोले यांनी प्रचारात सहभाग घेतला. तर महाविकास आघाडीचे इतर नेते, आमदार, खासदार, आणि पदाधिकाऱ्यांनी रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी मोठा जोर लावला.
हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
दुसरीकडे भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंसाठी भाजपच्या आमदार, खासदारांनी पुण्यात तळ ठोकला. मंत्री गिरीश महाजन, आणि रविंद्र चव्हाणांनी तर कसब्यातच आपला मुक्काम केला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅली, सभांमधून हेमंत रासनेंसाठी जोरदार प्रचार केला. तर एकनाथ शिंदेंची टीम देखील दिवस रात्र हेमंत रासने यांच्यासाठी मैदानात लढत राहिली.
हेही वाचा..“पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
दरम्यान, गेल्या २८ वर्षापासून कसबा विधानसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सुरूवातीला म्हणजे 1990 साली अण्णा जोशी या मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर खासदार गिरीश बापटांनी हा मतदार संघ 25 वर्षा ताब्यात ठेवला. त्यानंतर मुक्ता टिळक यांच्याकडे 2019 साली मतदार संघ गेला. त्यामुळे यातच आता हेमंत रासने हा भाजपचा बालेकिल्ला राखणार का काॅंग्रेस या मतदार संघात इतिहास घडवणार? ते येत्या ०२ मार्चला समणार आहे.
Read also
- चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान केंद्रावर मोबाईचा सर्रासपणे वापर
- हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
- हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली