पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान सुरू झाल्यानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी गळ्यात भाजप पक्षाचे मफलर घालून मतदान केले. त्यावरून हेमंत रासने यांनी आचारसंहितेचे भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी पोलीसांकडे दिली आहे.
हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
पोटनिवडणुकांच्या मतदानाच्या वेळी अनेक घडामोडी घडत आहेत,. मतदारांना भाजपकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यातच हेमंत रासने भाजपचे चिन्ह असलेले मफलर घेऊन मतदार केंद्रावर पोहचले. त्यावरून विरोधकांकडून आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
यातच कसबा पोटनिवडणुक मतदान केंद्रावर उमेदवार पक्षाचा मफलर घालून मतदान करणे गुन्हा नाही का? नूमवी मतदान केंद्रातील हेमंत रासने यांचा फोटो आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्यावी. सत्ताधारी यांनी कायद्यांनी राज्य चाललावे. असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केला आहे.
कसबा पोटनिवडणूक 2023
भाजप उमेदवाराने आचारसंहिता भंग तक्रार दाखल,त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करणे. pic.twitter.com/QSDhXnmnIL— Rupali patil thombare (@Rupalispeak) February 26, 2023
Read also
- हेही वाचा..चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा
- हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
- हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?
- हेही वाचा..“चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान केंद्रावर मोबाईचा सर्रासपणे वापर
- हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?