पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत चिंचवडमध्ये ३०. ३३ तर कसब्यातही ३०.०० टक्के मतदान झाले आहेत. मतदान करण्यासाठी आता फक्त तीन तास शिल्लक राहिले आहेत. सांयकाळी ६ वाजेपर्यंत किती टक्के मतदान होणार? याकडे सगळ्या उमेदवारांचं ल७ लागून राहिलं आहे.
हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानासाठी अवघे तीन तास शिल्लक राहिले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ३०. ३५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या दोन तासात सकाळी सात ते नऊ दरम्यान, ३.५३ टक्के, नऊ ते ११ दरम्यान, १०.४५ टक्के, अकरा ते १ दरम्यान २०.६८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत पाच लाख ६८ हजार ९५४ मतदारांपैकी ९९ हजार ५२६ पुरूष व ७४ हजार २६० महिला अशा एक लाख ७३ हजार ७८९ लोकांनी मतदान केले आहे. तीनवाजेपर्यंत एकूण ३०. ५५ टक्के मतदान झाले आहेत.
हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
दरम्यान, कसब्यात पुरूष मतदारपेक्षा महिला मतदार जास्त असून याठिकाणी महिलांच्या हातात आपला कसबा आहे. कसब्यात महिला मतदार १ लाख ३८ हजार ५५० आहेत. तर पुरूष मतदार १ लाख ३६ हजार ८७३ आहेत. तर तृतीयपंथी मतदार ५ आहेत. एकूण मतदार केंद्र ७६ असून बुथ संख्या २७० आहे. व ९ मतदार केंद्र संवेदशील म्हणून घोषीत करण्यात आले आहेत.
Read also
- हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
- हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?
- हेही वाचा..“चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान केंद्रावर मोबाईचा सर्रासपणे वापर
- हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
- हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा