मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यातच आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशानच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्याच अशी मागणी केली. यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेल येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मुलाखत घेण्यात आली. त्याआधी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे.
हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हांच्या सरकारने, कुसुमाग्रज जंयती २७ फेब्रवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरूपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरूवात केली.
हेही वाचा..चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही. असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या ‘मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही.
हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
व्यवहारात मराठी असावी, प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये, दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही! मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, ‘मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी’ आणि ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा’ हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा ! अस राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
‘… मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !’ #मराठीराजभाषादिन #MarathiRajbhashaDin pic.twitter.com/a82MFIyveS
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2023
Read also
- हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
- हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?
- हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
- हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”