मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आधी मनसेला धक्क्यावर धक्के बसले आहेत. यातच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभाग घेतल्याने मनसेच्या ८ कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर जवळपास १०० कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र ठोकला. यातच आता मनसेचत मसल मॅन म्हणून परिचित असलेले मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा..चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा
मनीष धुरी हे मनसेचे अंधेरेतील विभाग अध्यक्ष आहेत. मनीष धुरी यांनी राज ठाकरे यांच्या भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण केली होती. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा सहभाग आहे. मात्र अचानक मनीष धुरी यांनी मनसेच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. याचा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
दरम्यान, मनीष धुरी यांनी राज ठाकरे यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी मनसेत दिलेल्या वेगवेगळ्या पदांबाबत दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबात आभार मानले आहेत. तसेच वैयक्कित कारणामुळे पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रात मनीष धुरी यांनी म्हटले आहे. त्यातच आता मनीष धुरी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
Read also
- हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?
- हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
- हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”
- हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी