पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीकरीता काल जवळपास 50.06 टक्के मतदान झालं. काही अपवाद वगळता कसब्यात सुरक्षितपणे मतदान पार पाडलं. परंतु मतमोजणीआधी महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी त्यांनी आचारसहिंतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी गळ्यात भाजप पक्षाचे उपरणे घालून आले होते. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणुक आयोगाने रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निवडणुक प्रचार संपल्यानंतरही त्यांनी भाजपची पट्टी घालून प्रचार केल्याचं निदर्शनास आले.
हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?
दुसरीकडे प्रचार संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा पेठ गणपतीच्या समोर भाजपविरोधात आंदोलन केलं होतं. प्रचार संपल्यानंतरही त्यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत भाजपवर टिका केली होती. त्यानंतर भाजपच्या शिष्टाचार मंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
दरम्यान, मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी मतदान करतावेळीचा फोटो समाज माध्यमांवर टाकला होता. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या चिन्हासमोरील बटन असलेला एक फोटो पोस्ट केला होता. त्यांच्याविरोधात निवडणुक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मतदानाच्या आधी दोन्ही उमेदवारांवर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुक अधिकारी पुढे काय कारवाई करणार ? ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?
- हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
- हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”
- हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
- चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा