मुंबई : दिल्लीचे शिक्षणमंत्री आणि आम आदमी पार्टीचे आमदार मनीष सिसोदिया यांना सीबीआय ने अटक केल्याने आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक दिवसाच्या चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना काल सीबीआयने अटक केली. त्या अटकेच्या विरोधात आज मुंबईसह संपुर्ण भारतात भाजपविरोधात आंदोलनाचा पवित्रा आपने घेतला आहे. यातच मुंबई येथील आंदोलन कर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
दिल्लीत उत्पादन शुल्क विभागच्यावतीने सुरू केलेले नवे मद्द धोरण मनीष सिसोदिया यांच्या अटकेचे कारण ठरले आहे. या धोरणावरून सिसोदिया यांची याआधी देखील अनेकदा चौकशी झाली. तसेच सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचे कारण देत सीबीआयने काल त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज दिल्लीसह मुंबईत आपकडून आंदोलनाचा इशारा दिला.
हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”
आज सकाळीच आपचे कार्यकर्त्यांनी चर्चेगेट ते भाजप कार्यालय असा मार्ग स्विकार आंदोलन सुरू केलं. परंतु अर्ध्याच रस्त्यावर पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यामध्ये आपच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी देखील बघायला मिळाल्या. त्यामुळे सध्या राज्यातील एव्हाना देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
दिल्लीच्या अठरा लाख सर्व सामान्य मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवणाऱ्या दिल्लीच्या शिक्षण मंत्र्यांना अटक केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीष सिसोदिया यांना तुरूंगात टाकलं आहे. त्यामुळे ज्या ज्याठिकाणी भाजपची दमनशाही सुरू झाली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी गांधींनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसाच्या मार्गाने भाजपच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. पोलीस आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु संविधान मार्गाने चाललेलं आंदोलन आम्ही थांबवणार नाहीत. असं आपच्या प्रभारीने सांगितलं.
Read also
- हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
- हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
- हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?