जळगाव : मराठा विद्याप्रसारक संस्थेचे निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हात माजी विशेष सरकारी वकील अॅंड. प्रवीण चव्हाण यांनाही सह आरोपी करत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर प्रवीण चव्हाण यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यातच काल देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडचवण्याचा प्रयत्न होता. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनीह या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यावेळी माझ्यावर तर खोटे नाटे गुन्हे दाखल करून मला अडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलिसांच्या खिशातून हळूच चरस गांजा, अफु माझ्या गाडीत टाकून मला मोक्का लावण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. असं त्याकाळातील अधिकारी प्रवीण चव्हाण बोलतांना रेकार्ड झालं आहे. त्याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह ठेवला आहे. तसेच त्यात माझ्यासह देवेंद्र फडणवीस यांना देखील फसवण्याचा प्रयत्न होता. असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
तीन वर्षापुर्वी मी फोनवरून धमकी दिल्यानंतर माझ्यावर मोक्का लावण्यात आला. ती घटना एकनाथ खडसे यांच्या मतदार संघात घडला. अन् ती केस पुण्याला पाठवण्यात आली. अन् त्याठिकाणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अन् त्याला अटक करता येत नाही. म्हणून त्याच्या गाडीत ड्रग्ज टाका, गांजा टाका, असं सांगण्यात आल्याचं रेकार्ड झालं आहे. आता याची सगळी सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यातून सगळं बाहेर येईल. असाही इशारा त्यांनी दिला.
Read also
- हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य
- हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
- हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
- हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
- हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान