मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यातच आज मराठी गौरव दिन देखील महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. यात अधिवेशनाच्या पुर्वसंध्यला राज्यापाल रमेश बैस यांनी विधीभवनात हिंदीतून अभिभाषण केलं. मात्र आज मराठी गौरव दिन असल्याने राज्यपालांनी मराठीत तरी भाषण केलं पाहिजे होतं. असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हणत त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर नाराज व्यक्त केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुंगध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर केला आहे.
हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
त्यात रोहित पवारांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिन असताना राज्यपाल महोदयांनी अभिभाषण मराठीत केलं असतं किंवा भाषणाची सुरूवात जरी मराठीत केली असती तरी मराठी मनाला आनंद झाला असता. पण यात राज्यपालांचीही चुक नाही. अभिभाषण तर राज्य सरकार तयार करत असतं. कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय…! असा टोलाही रोहित पवारांनी राज्य सरकारला लगावला.
आज #मराठीभाषागौरवदिन असताना राज्यपाल महोदयांनी अभिभाषण मराठीत केलं असतं किंवा भाषणाची सुरवात जरी मराठीत केली असती तरी मराठी मनाला आनंद झाला असता. पण यात राज्यपालांचीही चूक नाही. अभिभाषण तर राज्य सरकार तयार करत असतं! कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2023
Read also
- हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
- हेही वाचा..““मला फसवण्यासाठी माझ्या गाडीत गांजा, चरस अफू..” गिरीश महाजनांचा मोठा दावा
- हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य
- हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
- हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप