पिंपरी चिंचवड : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ काल पुण्यातही जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील टिळक चौक निगडी येथे आपचे पिंपरी चिंचवड प्रभारी व राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाजी दिली. या आंदोलनात सहभागी आपच्या कार्यकर्त्यांनी जेल के ताले टूटेंगे मनीष सिसोदिया छूटेंगे, केंद्र सरकार चा पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला… ED , CBI च्या चुकीच्या कारवाया टळूदे, आप ले राज्य येऊ दे… मोदी केजरीवाल से डरता हे CBI को आगे करता हे…. अशा जोरदार घोषणा देऊन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला.
हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
दिल्लीतील आप सरकारच्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या प्रत्येक कामाला आडकाठी आणून त्रास देणाऱ्या भाजपने खोट्या-नाट्या गुन्ह्यामध्ये आपच्या नेत्यांना अडकवून जेल मध्ये टाकत आहे, आत्ताही दिल्लीच्या शिक्षणातील क्रांतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली असताना सूडबुद्धीने पेटलेल्या भाजपने सिसोदिया यांना अटक केली आहे. परंतु मनीष सिसोदिया यातून सहिसलामत सुटून येतील असा विश्वास प्रभारी हरीभाऊ राठोड यांनी व्यक्त केला.
हेही वाचा..““मला फसवण्यासाठी माझ्या गाडीत गांजा, चरस अफू..” गिरीश महाजनांचा मोठा दावा
यावेळी भाजपाने देशभरात राबवलेल्या अघोषित आणीबाणीचा समाचार घेत पिंपरी चिंचवड चे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले की, मोदी आणि शहा हे विरोधकांना नाहक त्रास देण्यासाठी ईडी सीबीआय आणि आयकर विभागाकडून सातत्याने खोट्या प्रकरणामध्ये अडकवून छळ करत आहे. लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या भाजप सरकारला सडक ते संसद पर्यंत जन-चळवळ उभी करुन विरोध केला जाईल.
हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य
यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, यशवंत कांबळे, ब्रह्मानंद जाधव, गोविंद माळी, वाजिद शेख, अभिजीत सूर्यवंशी, संतोष इंगळे, सरोज कदम, मीनाताई जावळे, कमलेश रणवरे, अमर डोंगरे, हारून अन्सारी, यल्लाप्पा वालदोर, रोहित सरनोबत, चंद्रमणी जावळे, कुणाल वकटे, अय्याज सय्यद, शुभम यादव, इमरान खान, सुरेंद्र कांबळे, सुनील शिवशरण, राहुल वाघमारे, गोपाल पिल्ले, नंदू नारंग, महेश पाटील, वाहिब शेख, सोनाली झोल, मनोहर पाटील, दीपक श्रीवास्तव, व आपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also
- हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल
- हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
- हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
- हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल
- हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका