नवी दिल्ली : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी गेल्या सहा महिन्यामध्ये नव्या लुकमध्ये दिसले आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असा अंतर पार करत दाढी वाढविली होती. त्यानंतर भारत जोडो यात्रेची सांगता झाल्यानंतरही त्यांनी दाढी तशीच ठेवली होती. मात्र राहुल गांधी आता थेट केंब्रिज जज बिझनेस स्कुलमध्ये पोहचल्याने त्यांचा नवीन लुक चर्चेत आला आहे.
हेही वाचा..“पहाटेच्या शपथविधीबाबत माझ्या आत्मचरित्रात लिहिणार, तेव्हा वाचा”, अजित पवारांचं सुचक विधान
महाराष्ट्रा काॅंग्रेसने आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांच्या नव्या लुकमधील गोष्टींबाबत भाष्य केलं आहे. राहुल गांंधी हे ब्रिटनमध्ये केंब्रिज विद्यापीठात २१ व्या शतकात ऐकायला शिकणे हे किती महत्वाचे आहे. याववर व्याख्यान देत आहेत. अंधभक्तांच्या दृष्टीने जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या त्यांच्या नेत्याला अजूनपर्यंत केंब्रिजमध्ये व्याख्यान देण्यास का बोलवलं नाही, या विचाराने सध्या त्यांचे मन हेलावले असल्याचा खोचक टोला काॅंग्रेसने भाजपला लगावला आहे.
हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?
या व्याख्यानाबाबत राहुल गांधी यांनी १६ फेब्रुवारी रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, मी केंब्रिज विद्यापीठात भाषण देण्यासाठी पुर्णपणे तयार आहे. याचा मलाआनंद आहे. मला आंतरराष्ट्रीय समस्या, आंतराराष्ट्रीय संबंध, डेटा आणि लोकशाही या विषयांवर जगातील सर्वोत्तम लोकांशी संवाद साधायला मिळणार आहे.
Read also
- हेही वाचा..““..तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील”, सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
- हेही वाचा..“एकीकडे सत्तासंघर्ष, तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस अन् शिवसेनेत वाद”,खैरेंनी धानोरकरांना थेट इशाराच दिला
- हेही वाचा..सहानुभूतीची लाट अश्विनी जगतापांच्या पाठीशी, चिंचवड भाजपच्या ताब्यात, एक्झिट पोल काय सांगतंय?
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स भरारी घेईल”
- हेही वाचा..““विधीमंडळ नव्हे चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ “,राऊतांवर हक्कभंगाची कारवाई?