चंद्रपुर : उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि धनुष्यबाण गेल्यानंतर आता सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. हे प्रकरण येत्या दहा दिवसात संपवण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून ‘शिवगर्जना अभियान’ सुरू करण्यात आले आहेत. या अभियानादरम्यान काॅंग्रेस आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काॅंग्रेसचे खासदार बाळु धानोरकर यांना थेट इशाराच दिला आहे. चंद्रपुर येथे शिवगर्जना अभियान सुरू असतांना त्यांच्यात वाद झाला होता. त्यावरून आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही लागू नका. जे काही पक्षप्रमुख सांगतील ते होईल. पण मध्ये तुम्ही बोलायचं नाही. त्रास जर दिला तर मी तुमच्या पक्षाला सांगणार की तुमचा बाळू धानोरकर कोण आहे? आणि त्याचे व्यवसाय काय आहे? चंद्रकांत खैरे यांनी त्यांनी फक्त त्यांना इशाराच दिला आहे, असं नाही तर त्यांनी त्याही पुढे जाऊन म्हटले की, जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर तुमची मिसेल आमदार प्रतिभा धानोरकर देखील निवडून येणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
महाविकास आघाडीत काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आहेत. मात्र आता चंद्रकांत खैरे यांच्या या इशाारमुळे पक्षांतर्गत असलेल्या वादावर काय तोडगा निघणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Read also
- हेही वाचा..सहानुभूतीची लाट अश्विनी जगतापांच्या पाठीशी, चिंचवड भाजपच्या ताब्यात, एक्झिट पोल काय सांगतंय?
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स भरारी घेईल”
- हेही वाचा..““विधीमंडळ नव्हे चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ “,राऊतांवर हक्कभंगाची कारवाई?
- हेही वाचा..“पहाटेच्या शपथविधीबाबत माझ्या आत्मचरित्रात लिहिणार, तेव्हा वाचा”, अजित पवारांचं सुचक विधान
- हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?