मुंबई : विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असं म्हटल्यानंतर खासदार संजय राऊतांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. त्याआधी विधानसभेच्या सभागृहात देखील सत्ताधारी आमदारांनी संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृह दोन ते तीन वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?
भाजप आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, आणि शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी देखील नाराजी व्यक्त करत त्यांचं वक्तव्य परत एकदा तपासून पाहण्याची विनंती केली. “कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला विधीमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. पण या बातमीत तथ्य आहे का? हे देखील तपासले पाहिजे.” त्यावर काॅंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य तपासून पाहण्याची विनंती केली.
हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
त्यानंतर विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांच्या अटकेचा मुद्दा लावून धरला. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. त्यावर पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची चौकशी करून सभागृहाचं कामकाज पुढील कामकाज सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं.
हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निषेध व्यक्त केला. विधीमंडळाला चोरमंडळ म्हणणं योग्य नाही. एका मोठ्या सभागृहाचे नेते असं वक्तव्य करीत असतील तर ते योग्य नाही. त्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा अधिकार सभापती यांना आहे. परंतु यावर आपण काहीच कारवाई केली नाही. तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील. रोज ते या विधानमंडळाचा अपमान करतील. असा रोषही त्यांनी व्यक्त केली.
Read also
- हेही वाचा..“एकीकडे सत्तासंघर्ष, तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस अन् शिवसेनेत वाद”,खैरेंनी धानोरकरांना थेट इशाराच दिला
- हेही वाचा..सहानुभूतीची लाट अश्विनी जगतापांच्या पाठीशी, चिंचवड भाजपच्या ताब्यात, एक्झिट पोल काय सांगतंय?
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स भरारी घेईल”
- हेही वाचा..““विधीमंडळ नव्हे चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ “,राऊतांवर हक्कभंगाची कारवाई?
- हेही वाचा..“पहाटेच्या शपथविधीबाबत माझ्या आत्मचरित्रात लिहिणार, तेव्हा वाचा”, अजित पवारांचं सुचक विधान