मुंबई : देशातील महागाईने पुन्हा एकदा वर डोकं काढलं आहे. होळी सणाच्या अगोदरच सिंलेडरच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून यावरून राज्यातील तसेच केंद्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर प्रचंड टिका करत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स भरारी घेईल”
मागील काही दिवसापासून सिंलेंडरच्या किमंतीत प्रचंड वाढ होत आहे. घरगुती गॅस सिंलिंडरचे दर ५० तर कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर ३५० रूपयांनी महगला आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरच किंमत आधी १०५२.५० रूपये होती. आता हा सिलिंडर ११०२.५ रूपयांना मिळणार आहे. तर मुंबईत कर्मिशय गॅस सिलिंडर १७२१ रूपयांना मिळत होता. तो आता २०७१.५ रूपयांना मिळणार आहे.
हेही वाचा..““विधीमंडळ नव्हे चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ “,राऊतांवर हक्कभंगाची कारवाई?
सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवरून राष्ट्रवादीने केंद्रीय मंत्री स्मृती ईराणीचा फोटो ट्विट केला आहे. जब महंगाई नही बढ़ी थी, स्मृती ईराणी जी तब लड़ी थी, आज एलपीजी की किमत सताती है, स्मृती जी की बहुत याद आती है.. असं म्हणत राष्ट्रवादीने स्मृती ईराणींना डिवचलं आहे. केंद्राच्या बजेटने सर्वसामान्यांची घोर निराशा केली. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून केंद्राने जनतेला नवा झटका दिलाय. राज्याचे बजेट तोंडावर असताना, बजेटच्या आधीच सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला कात्री लागली असून हे खोके सरकार राज्याच्या बजेटद्वारे जनतेला दिलासा देणार का? असा सवालही राष्ट्रवादीने केला आहे.
जब महंगाई नही बढ़ी थी
स्मृती इराणी जी तब लड़ी थी
आज एलपीजी की किमत सताती है
स्मृती जी की बहुत याद आती है!@BJP4Maharashtra @BJP4India #LPGPriceHike #LPGCylinderPriceHike pic.twitter.com/Q0w01LAaMM— NCP (@NCPspeaks) March 1, 2023
Read also
- हेही वाचा..“ठाकरेंच्या वकिलांचे मुद्दे शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढले,” उद्या सत्ता संघर्षावर अंतिम सुनावणी
- हेही वाचा..““नव्या लुकमध्ये केंब्रिजमध्ये पोहचले राहुल गांधी,” ‘या’ विषयावर देणार व्याख्यान, काॅंग्रेसने मोदींना डिवचलं
- हेही वाचा..““..तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील”, सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
- हेही वाचा..“एकीकडे सत्तासंघर्ष, तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस अन् शिवसेनेत वाद”,खैरेंनी धानोरकरांना थेट इशाराच दिला
- हेही वाचा..सहानुभूतीची लाट अश्विनी जगतापांच्या पाठीशी, चिंचवड भाजपच्या ताब्यात, एक्झिट पोल काय सांगतंय?