मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मागील पाच दिवसापासून ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. आज शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांचे मुद्दे शिंदे गटाच्या वकिलांनी खोडून काढलेत. यातच न्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांना काही प्रश्न विचारले.
हेही वाचा..जब महंगाई नही बढ़ी थी, तब लड़ी थी, आज एलपीजी की किमत सताती है, स्मृतीजी की बहुत याद आती है!
बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीप पाळायला हवा? तुमच्या दाव्यानुसार विधिमंडळ पक्षाने नेमलेल्या प्रतोदचा व्हीप पाळायला हवा. पण इथे दोन व्हीप एकाच वेळी अस्तित्वात आहेत. याचा अर्थ तुमच्यामते बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीप पाळायला हवा, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना केला. बहुमत आणि व्हिप पाहून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे उत्तर कौल यांनी दिले.
हेही वाचा..“ठाकरेंच्या वकिलांचे मुद्दे शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढले,” उद्या सत्ता संघर्षावर अंतिम सुनावणी
या सुनावणीवेळी जर विधानसभा अध्यक्षांनी ३९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली असती, तर कदाचित मविआ आघाडीचे सरकार सत्तेत राहिले नसते. पम तसे झाले असते, तर महाराष्ट्रातल्या सत्तेचे चित्र वेगळे काहीतरी दिसले असते. विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेंना तेव्हा अपात्र ठरवू शकले नाहीत, म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा शपथविधी झाला हा त्यांचा दावा एका अर्थाने बरोबर आहे, असे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केले.
हेही वाचा..““नव्या लुकमध्ये केंब्रिजमध्ये पोहचले राहुल गांधी,” ‘या’ विषयावर देणार व्याख्यान, काॅंग्रेसने मोदींना डिवचलं
दरम्यान, गुरुवारी सकाळी पहिला एक तास नीरज कौल युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करतील. दुपारी लंचपूर्वी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांचा युक्तिवाद होईल. लंचनंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल रिजॉइंडर सादर करतील, असे सांगितले जात आहे.
Read also
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
- हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान
- हेही वाचा..“अयोध्यावरून ‘धनुष्यबाण’ आणून राज्यभर फिरवणार, शिंदेंची राज्यात ‘शिवधनुष्य’ यात्रा
- हेही वाचा..“श्रीराम सेना हिंदुस्थान संस्था, पोलीस मित्र संघटना, आज कोण कोणी ठाकरे गटात प्रवेश केला ?
- हेही वाचा..“मग उद्धव ठाकरेही चोर आहेत”, फडणवीसांकडून संजय राऊतांचा समाचार, राजकारण तापलं