मुंबई : राज्यात निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्याने ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं. शिंदेंच्या गटाच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाकडून राज्यात शिवगर्जना आणि शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. यातून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या आमदारांवर कडाडून प्रहार करण्यात येत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाने नवी रणनीती आखली आहे.
हेही वाचा..““..तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील”, सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
ठाकरेंच्या शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला शिंदे गटाकडून ‘शिवधनुष्य’ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे सह शिंदे गटातील सर्व आमदार अयोध्या दौरा करणार आहे. त्या दौऱ्यात अयोध्यातील प्रसिद्ध महंतांकडून धनुष्यबाण घेऊन येणार आहेत.तो धनुष्यबाण संपुर्ण राज्यभर फिरणावर असून याची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांकडे देण्यात येणार आहे.
हेही वाचा..“एकीकडे सत्तासंघर्ष, तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस अन् शिवसेनेत वाद”,खैरेंनी धानोरकरांना थेट इशाराच दिला
धनुष्यबाण यात्रेचं आयोजन अयोध्या दौऱ्यानंतर करण्यात येणार असून या यात्रेचं घोषवाक्य म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण ठेवण्यात आला आहे. ठाकरे गटाची २५ फेब्रुवारीपासून राज्यभरतात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरू झाले आहेत. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान हे अभियान सूरू राहणार आहे. त्यानंतर आता धनुष्यबाण अभियान सुरू करण्यात येणार आहे.
Read also
- हेही वाचा..“श्रीराम सेना हिंदुस्थान संस्था, पोलीस मित्र संघटना, आज कोण कोणी ठाकरे गटात प्रवेश केला ?
- हेही वाचा..“मग उद्धव ठाकरेही चोर आहेत”, फडणवीसांकडून संजय राऊतांचा समाचार, राजकारण तापलं
- हेही वाचा..जब महंगाई नही बढ़ी थी, तब लड़ी थी, आज एलपीजी की किमत सताती है, स्मृतीजी की बहुत याद आती है!
- हेही वाचा..“ठाकरेंच्या वकिलांचे मुद्दे शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढले,” उद्या सत्ता संघर्षावर अंतिम सुनावणी
- हेही वाचा..““नव्या लुकमध्ये केंब्रिजमध्ये पोहचले राहुल गांधी,” ‘या’ विषयावर देणार व्याख्यान, काॅंग्रेसने मोदींना डिवचलं