मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. संजय राऊतांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करतांना विधीमंडळाचा ‘चोरमंडळ’ म्हणून उल्लेख केला. त्यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर संजय राऊतांवर सत्ताधारी पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांकडे राऊतांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर दोन्हीही सभागृह दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं.
हेही वाचा..“ठाकरेंच्या वकिलांचे मुद्दे शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढले,” उद्या सत्ता संघर्षावर अंतिम सुनावणी
संजय राऊतांच्या विरोधात आज सभागृहात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सहमती दर्शविली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणाबाबत 08 मार्चला निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं.
हेही वाचा..““नव्या लुकमध्ये केंब्रिजमध्ये पोहचले राहुल गांधी,” ‘या’ विषयावर देणार व्याख्यान, काॅंग्रेसने मोदींना डिवचलं
यातच आता सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून हक्कभंग समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या समितीमध्ये १५ सदस्य असून यात विरोधी पक्षातील आमदारांनाही घेण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्षपद राहुल कुल, अतुल भातखळकर, भरत गोगावले यांच्यापैकी एकाकडे देण्यात येणार असून यात भाजपकडून १० तर महाविकास आघाडीतील ५ सदस्य असणार आहे.
हेही वाचा..““..तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील”, सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
दरम्यान, हक्कभंग समितीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून सुनिल भुसारा, दिलीप मोहिते तर काॅंग्रेसकडून नितीन राऊत, सुनिल केदार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचाही यामध्ये समावेश असणार असून ही समिती संजय राऊतांना नोटीस पाठवणार आहे. त्यात संजय राऊतांना ४८ तासांची मुदत देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also
- हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान
- हेही वाचा..“अयोध्यावरून ‘धनुष्यबाण’ आणून राज्यभर फिरवणार, शिंदेंची राज्यात ‘शिवधनुष्य’ यात्रा
- हेही वाचा..“श्रीराम सेना हिंदुस्थान संस्था, पोलीस मित्र संघटना, आज कोण कोणी ठाकरे गटात प्रवेश केला ?
- हेही वाचा..“मग उद्धव ठाकरेही चोर आहेत”, फडणवीसांकडून संजय राऊतांचा समाचार, राजकारण तापलं
- हेही वाचा..जब महंगाई नही बढ़ी थी, तब लड़ी थी, आज एलपीजी की किमत सताती है, स्मृतीजी की बहुत याद आती है!