पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतदान मोजणी सुरू झाली आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत. यात चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ह्या आघाडीवर असून नाना काटे आणि राहुल कलाटे हे दोन्हीही पिछाडीवर आहेत.
हेही वाचा..“मग उद्धव ठाकरेही चोर आहेत”, फडणवीसांकडून संजय राऊतांचा समाचार, राजकारण तापलं
सकाळी कसब्याच्या मतमोजणीत पोस्टर मतदानात रविंद्र धंगेकरांनी या आघाडी घेतली होती. कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, तिसऱ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांची आघाडी कमी झाली आहे. रवींद्र धंगेकर यांना 11,157 मतं मिळाली असून, हेमंत रासने यांनी 10,673 मतं मिळाली आहेत. हेमंत रासने यांनी तिसऱ्या फेरीअखेर धंगेकरांची आघाडी कमी केली असून, सध्या धंगेकर जवळपास 500 मतांनी आघाडीवर आहेत.
हेही वाचा..जब महंगाई नही बढ़ी थी, तब लड़ी थी, आज एलपीजी की किमत सताती है, स्मृतीजी की बहुत याद आती है!
“या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. मी पोस्टल मतांमध्ये कायम आघाडीवर राहतो. आता शेवटच्या फेरीपर्यंत माझी अशीच आघाडी राहणार. माझं लीड २ हजार मतांच्या पुढे जाईल. मतांची कोणतीही विभागणी होणार नाही. मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपला”. अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा..“ठाकरेंच्या वकिलांचे मुद्दे शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढले,” उद्या सत्ता संघर्षावर अंतिम सुनावणी
कसबा पोटनिवडणूक मतदारसंघात कुंभारवाडा, शिंपी आळी, भाई वाडा, पवळे चौक, गावकोस मारुती परिसर या पूर्वेकडील भागात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीत ज्या १४ मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली तो संपूर्ण भाग काँग्रेसला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे या भागात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुक फेरी
चौथी फेरी!
रवींद्र धंगेकर १४८९१
हेमंत रासने १४३८२
आनंद दवे १००
पाचवी फेरी
रवींद्र धंगेकर १९०२०
हेमंत रासने १७०५३
आनंद दवे १००
पिंपरी चिंचवड चौथी फेरी
अश्विनी जगताप १३,९३१
नाना काटे १२,८३२
राहुल कलाटे ४,५९९
पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा तीन हजार मतांनी आघाडीवर
Read also
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
- हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान
- हेही वाचा..“अयोध्यावरून ‘धनुष्यबाण’ आणून राज्यभर फिरवणार, शिंदेंची राज्यात ‘शिवधनुष्य’ यात्रा
- हेही वाचा..“श्रीराम सेना हिंदुस्थान संस्था, पोलीस मित्र संघटना, आज कोण कोणी ठाकरे गटात प्रवेश केला ?