नागपूर : येत्या महापालिका निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्व राजकीय नेते सक्रिय झाले आहे. नागपूरमध्येही भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते सक्रिय झाले असून नुकतीच त्यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. फडणवीस यांच्या नागपुरातील घरी गडकरी यांनी भेट दिली.दोन्ही नेत्यांकडून महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे .
पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या निवडणुकीत भाजपाला मिळालेले अपयश पक्षातील नेत्यांना चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसते. हे पाहता आगामी निवडणुकीत कोणत्या महापालिकेत काय परिस्थिती आहे?, भाजपला कुठे अनुकुल वातावरण आहे?, कुठे आणखी जोर लावाला लागू शकतो?, कोणत्या महापालिकेची जबाबदारी कोणत्या नेत्यावर सोपवायची?, अशा अनेक विषयांवर गडकरी- फडणवीस यांच्यात चर्चा झाली .
शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण…; छगन भुजबळ
फडणवीस-गडकरींमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नागपूर महापालिकेवर भाजपाचो सत्ता कशी प्रस्थापित करण्यात येणार याबाबत मेगाप्लॅन ठरला असल्याची माहिती आहे .
Read Also :
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ तेलाची बाटली भेट!
- केंद्र सरकार महावितरणचं खाजगीकरण करण्याच्या तयारीत? ऊर्जा राज्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान
- पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
- भाजपच्या महापौरांनी घेतला शरद पवारांचा आशिर्वाद; पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधान
- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली