मुंबई : मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचे दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही, अशी टिका सामनातून शिवसेनेने भाजपवर केली आहे. त्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
कोर्टात लढाई सुरू असताना काॅंग्रेस, भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंचं बळ वाढलं
ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला ” मग घ्या ना धौती योग!” भाजपा दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. असं भाजप मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मोठा ट्विस्ट..! उद्धव ठाकरेचं 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष, कोर्टात कागदपत्र सादर
कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे “करुन दाखवले” असे होर्डिंग लावले नाहीत. पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता “थापा” पण राहिला नाही आणि उत्सवही . यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली. गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच! अहंकार, गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना. असा शाब्दिक हल्लाबोल देखील त्यांनी शिवसेनेवर केला आहे.
दरम्यान, शिवसेना शिल्लक आहे म्हणून मराठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकवले, गर्वाने मराठी पणाची कवचकुंडले दिली. पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठ्यांचे दुर्भाग्य काय आजचे आहे. अशी टिका देखील सामनातून शिंदे गटावर केली आहे.
Read also
- “कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
- “देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
- गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
- राजकीय लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय; वाचा संपुर्ण यादी
- रात्री 12 पर्यंत मनसोक्त गरबा नाचा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय