मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरूद्ध धडक कारवाई केली आहे. अलिकडेच एनआयएने देशात विविध ठिकाणी छापे टाकून 150 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहेत. याचे पडसाद उग्र स्वरूपात पुण्यात पडल्याने आता केंद्र सरकारने पीएफ आयवर पाच वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वागत केले आहे.
पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्हांमध्ये सहभागी असल्याने तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रीय झाली होती. या संघटनेचा पुण्यासारख्या शहरात देखील घातपात घडवून आणण्याचा कट समोर आलं होतं.
“कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही”; ठाकरेंचा शहांवर अप्रत्यक्ष निशाणा
महाराष्ट्रतील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, असं मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी म्हटलं आहे.
“मंत्रालयातून संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
दरम्यान, केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षाकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पीएफआय या संघटनेवर बंदी घालावी अशी देशातील अनेक राज्यांनी मागणी केली होती. एनआयएने टाकलेल्या अनेक छाप्यांमध्ये या संघटनेचा हात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात होती.
Read also
- गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
- राजकीय लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय; वाचा संपुर्ण यादी
- रात्री 12 पर्यंत मनसोक्त गरबा नाचा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
- कोर्टात लढाई सुरू असताना काॅंग्रेस, भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंचं बळ वाढलं
- मोठा ट्विस्ट..! उद्धव ठाकरेचं 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष, कोर्टात कागदपत्र सादर